---Advertisement---

Farmer ID : शेतकऱ्यांना आता मिळणार ‘फार्मर आयडी’

---Advertisement---

Agristack Scheme : लातूर जिल्ह्यात सोमवारपासून (ता. १६) ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देण्यासाठी गावोगावी कॅम्प आयोजित केले जाणार आहेत.

राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने लातूर जिल्ह्यात सोमवारपासून (ता. १६) ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देण्यात येणार आहेत.

यासाठी प्रत्येक गावात कॅम्प आयोजित केले जाणार असून या कॅम्पमध्ये गावातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपला शेतकरी ओळख क्रमांक्र तयार करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ॲग्रीस्टॅकमध्ये शेतकऱ्यांसाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतीचा आधार संलग्न माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच आणि भू संदर्भिकृत भूभाग असणारे गाव नकाशे यांचा माहिती संच याचा यात समावेश आहे.

ॲग्रीस्टॅक योजनेचे फायदे

  • पीएम किसान योजनेंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यक अटी पूर्ण करण्यामध्ये सुलभता येईल.
  • पीएम किसान योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास सहाय्य मिळेल.
  • शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करून घेण्यात सुलभता येईल.
  • किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होऊ शकेल.
  • शेतकऱ्यांना ऑनलाइन पीक कर्ज उपलब्ध करून देणे शक्य होणार.अशी होणार योजनेची अंमलबजावणी
  • पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल.

अशी होणार योजनेची अंमलबजावणी

ॲग्रीस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीसाठी ता. १६ डिसेंबरपासून गावनिहाय तीन दिवस कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. या कॅम्पसाठी ग्राम महसूल अधिकारी व कृषी सहाय्यक तथा ग्राम विकास अधिकारी यांच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गावनिहाय आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पच्या वेळापत्रकाबाबत पथकातील कर्मचारी हे गावात माहिती देतील.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment